Price: ₹0.00
(as of Mar 18, 2024 14:52:53 UTC – Details)
मालवणी भाषा म्हणजे वाचकाच्या जिभेवर गोड रसाळपणा निर्माण करणारी मराठीची लाडकी बोली. या भाषेतील कथा-कविता यांना एक वेगळीच मजेशीर आणि आपुलकीची झाक असते. अश्या मातृभाषेतील आपलेपणा जपणारे आणि मुंबई मध्ये राहूनही आपली कोकणी मुळे न विसरणारे लेखक ‘प्रभाकर भोगले’ यांचा ‘इरसाल गजाली’ हा मालवणी बोलीतील कथासंग्रह. या कथासंग्रहास सन – २००५ साली, को. म.सा.प. संस्थेतर्फे दिला जाणारा ‘विशेष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
मालवणातील ‘गणपती उत्सव’ म्हणजे कोकणी लोकांचा ‘जीव की प्राण’, या उत्सवातील गमती जमतींपासून सुरु होणार हा संग्रह अवघ्या ६ कथांमधून वाचकाला आपलेसे करतो. कधी तो लग्नसमारंभाचे वर्णन करून वाचकांना भावनिक करतो, तर कधी “बाबल्या” आणि आचार्य अत्र्यांची गोष्ट सांगून वाचकाला लोटपोट करतो. अश्या या अनोख्या संग्रहाचा वाचकांनी नक्की आस्वाद घ्यावा, आणि कोकणची एक मजेशीर सैर केल्याचा आनंद घ्यावा !
Malvani language is the beloved dialect of Marathi which creates sweetness on the tongue of the reader. The stories and poems in this language have a different kind of fun and affection. ‘Ersal Gajali’ is a collection of stories in Malvani dialect by ‘Prabhakar Bhogle’, a writer who cherishes his mother tongue and does not forget his Konkani roots even while living in Mumbai. This collection of stories was awarded with M.S.P.A organization’s ‘special award’ in 2005.
The ‘Ganpati Festival’ in Malwana is the ‘love’ of the Konkani people. The stories starts with the Festival and in only 6 stories he make readers his beloved. Sometimes he makes the reader emotional by describing the wedding ceremony in konkan, and sometimes he makes the reader laugh by telling the stories like “Babalya” and Acharya Atre. Readers should definitely enjoy this unique collection, and enjoy a fun trip to Konkan !
There are no reviews yet.